आहार विहार

सेल्फी च्या मोहात दोघांचा बळी, चौघे वाचले…….!

करमाळा दि.१ –  करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आलेल्या अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात  सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून चौघांचे प्राण वाचवले.

काल दुपारी अकलूज येथील हे शेंडगे कुटुंब नावेतून उजनी जलाशयात मौजमस्ती करत होते. यावेळी उभे राहून सेल्फी घेताना नाव उलटली आणि यात विकास शेंडगे (39) आणि त्यांचा 13 वर्षाचा मुलगा जय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र याचवेळी इतर मच्छीमारांनी या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकत विकास यांची पत्नी स्वाती, नऊ वर्षाची मुलगी अंजली, विकासचे मित्र जयवंत सातव व सातव यांच्या मुलाला वाचवले.

दरम्यान  दोन वर्षांपूर्वी उजनी जलाशयात नाव उलटून अकलूज येथील काही डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. वाचवण्यात आलेल्या शेंडगे यांच्या पत्नी व मुलीला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close