#Job

30 टक्के पद भरती बाबत राज्य सरकार घेणार निर्णय…….!

मुंबई दि.३ – कृषी विभागातील सुमारे ३० टक्के पदे रिक्त आहेत. या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पदभरती करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मंगळवारी सांगितले की, राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण २७ हजार ५०२ पदांचा आकृतिबंध मंजूर असून त्यापैकी १८ हजार ६२२ पदे भरलेली आहेत, तर ८ हजार ८८० पदे रिक्त आहेत. विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. तसेच तांत्रिक संवर्गाची २० हजार १८१ पदे मंजूर असून त्यापैकी १४ हजार ८०९ पदे भरलेली आहेत, तर ५ हजार ३७२ पदे रिक्त आहेत. १६ मे २०१८ शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत. या आदेशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर मर्यादा आहेत. मात्र, लवकरच करोना नियंत्रित येईल आणि त्यानंतर पदभरती केली जाईल असे भुसे यांनी सांगितले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close