क्राइम

नव्या पेट्रोल पंपातून २ लाख ६१ हजाराच्या डिझेलची चोरी…..!

केज दि.६ – केज – अंबाजोगाई राज्य मार्गावरील चंदनसावरगाव शिवारात नव्याने सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या डिझेल टाक्यात टेस्टिंगसाठी ठेवलेले २ लाख ६१ हजार रुपयांचे २ हजार ९५० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         धारूर तालुक्यातील पांगरी येथील निलेश शंकर गायकवाड यांचा केज – अंबाजोगाई राज्य मार्गावरील चंदनसावरगाव शिवारात नव्याने सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपाचे काम अंतिम टण्यात आहे. पेट्रोल पंपावर बसविण्यात आलेल्या डिझेल टाक्यांची टेस्टिंग करण्यासाठी त्यांनी २ हजार ९५० लिटर डिझेल मागवून टाक्यात सोडले होते.
     दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून पाईपच्या मदतीने दोन लाख ६१ हजार रुपयांचे २ हजार ९५० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ( ता. ५ ) रात्री घडली. निलेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार जनार्धन कांबळे हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close