क्राइम

केज तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण……!  

केज दि.१७ –  एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून पळवून नेऊन अपहरण करण्यात आल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी काशीदवाडी येथील एका जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         केज तालुक्यातील एका वस्तीवर वास्तव्यास असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १५ मार्च रोजी रात्री घरी होती. मात्र रात्री ९.३० ते १०.३० वाजेच्या दरम्यान ही मुलगी घरातून बेपत्ता झाली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठे गेली याचा तपास लागला नाही. मात्र आरोपी कृष्णा बाळासाहेब जाधवर ( रा. काशीदवाडी ता. केज ) याने सदरील मुलगी ही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन तिचे अपहरण केले, याची खात्री पटल्यानंतर सदर मुलीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कृष्णा जाधवर याच्याविरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close