#Vaccination

आता लसीचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यानंतर…….!

नवी दिल्ली दि.२२ – भारतात कोरोनावर देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये आता 6 ते 8 आठवड्यांचे अंतर असणार आहे. या आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 4 ते 6 आठवड्यांच्या आत घेतला जायचा, परंतू आता या डोसमधील अंतर वाढविण्यात आलं आहे.

नॅशनल टेक्निकल ऍडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन (NTAGI) आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

कोविशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की, त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना द्याव्यात. जेणेकरून लसीकरणाच्या कार्यक्रमात कोणताही खंड पडणार नाही आणि लसीकरणाचा हा कार्यक्रम सुरळीत पार पडेल.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close