क्राइम

कळंब येथे नायब तहसीलदारासह अन्य दोघे लाच घेताना घेतले ताब्यात, तर गेवराईत कृषी पर्यवेक्षक चतुर्भुज……!

कळंब दि.२२ –  6693 रुपयांची लाच मागणी करून 6700 रुपये स्वीकारल्याने लाच रक्कम प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद पथकाने एका नायब तहसीलदार (पुरवठा) सह तिघांना लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतले आहे.
                    तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकानदार असून तक्रारदार यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले होते. त्याचे प्रत्येकी एक क्विंटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. तक्रारदार यांचे मागील तीन महिन्याचे 44623 /- रुपये बिल काढून देण्यासाठी श्रीरंग साधू डोंगरे (स्वस्त धान्य दुकानदार व अधक्ष्य, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना रा. कोथळा, तालुका कळंब), विलास ज्ञानोबा पिंगळे (स्वस्त धान्य दुकानदार, राहणार पाथर्डी, तालुका कळंब), श्रीमती परविन उमर दराज खान पठाण (नायब तहसीलदार (पुरवठा) तहसील कार्यालय, कळंब जिल्हा उस्मानाबाद) यांनी तक्रारदार यांना बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के 6603 रुपये लाचेची मागणी करून आरोपी क्रमांक 1 डोंगरे यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष स्वीकारले याबाबत पो स्टे कळंब, ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपतेपोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबादयांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी केली. याकामी पोलीस अंमलदार इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर चालक तत्तात्रय करडे यांनी मदत केली. कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद (मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे यांनी केेले आहे.
                                  तर बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली. संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्‍या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील कृषी कार्यालयात देशमुख यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, बीड पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, श्रीराम गिराम, गारदे यांनी केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close