#Lockdown

लॉकडाऊनबाबत पुनर्विचार  व्हावा ; युवानेते समियोदीन इनामदार

केज दि.२५ – बीड जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासुन लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती महागाई, बाजार पेठेतील आर्थिक मंदी यामुळे अगोदरच सामान्य नागरीक आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन करणे सामान्य माणसांना परवडणारे नाही. शासनाने कडक निर्बंध घालून नागरिकांना शिस्त लावावी. लॉकडाऊन हा पर्याय ठरू शकत नाही. सामान्य नागरिकांची  आर्थिक कोंडी रोखण्यासाठी लॉकडाऊन बाबत पुनर्विचार करता येतो का? याबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी समाजसेवक ताथ युवा नेते समियोदीन इनामदार यांनी केली आहे.
                 गेल्या कांही दिवसांपासुन कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर शासनाच्या वतीने उपचार व प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत. ते मोठ्या प्रमाणात वाढवून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र लॉकडाऊनच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरू नये. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या लॉकडाऊनमुळे  अगोदरच बाजार पेठेत आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. ती अर्थव्यवस्था अद्यापही सुरूळीत झाली नसताना पुन्हा दुसरा लॉकडाऊन सामान्य नागरिकांची गोची करणारा होवू लागला आहे. अनेकांचे उदरनिर्वाह दैनंदिन रोजनदारीवर आहेत. शेतकर्‍यांचा भाजीपाला दररोज बाजारात येतो. दुकानावर हॉटेल, टपर्‍या इथे काम करणारे मजुर दररोजच्या रोजनदारीवर असतात. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न भेडसावणारा आहे.‌ अ‍ॅक्टोरिक्षाचालक, छोटे वाहन चालक यांचे व्यवसाय अगोदरच चालत नाहीत. व्यवसाय मंदावल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. या मार्चंएन्ड मध्ये हे हप्ते भरावे लागणार आहेत.  अशीस्थिती राहिली तर त्यांचे बँकेचे कर्ज पुन्हा वाढत जाईल. बारा बलुतेदार,फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, व रस्त्यावरील विविध वस्तुंची विक्री करणारे  विक्रेते यांचे व्यवसाय अडचणीत येतील. लॉकडाऊनमुळे दैनंदिन दुग्ध व्यवसायही संकटात सापडणार आहे. हॉटेल, व्यवसाय बंद राहिल्याने व बंदच्या काळात वाहतुक बंद राहिल्याने दुध संघही दुध घेत नाहीत. अशा स्थितीत दुध फेकुन देण्याची वेळ शेतकर्‍यांवर येते. मात्र महाग कडबा, महागडी पेंढ, विकत घेवून शेतकर्‍यांना दुधाचा व्यवसाय जोपासावा लागतो. तोही तोट्यात येत आहे.
                  अशा स्थितीत शासनाने नागरिकांना मास्कचा सक्तीने वापर, सामाजिक आंतराची शिस्त लावावी. या बाबत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जनतेवर वचक ठेवावा.व्यापारी व नागरिक यांना मास्क व सॅनिटायझर च्या वापराची सक्ती करावी. जे नागरिक सर्दी, खोकला व कोरोनांच्या लक्षणांनी बाधित असतील त्यांना रुग्णालयात पाठवावे.व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट सुरू ठेवाव्यात. बाजारपेठेत कडक शिस्त लावावी. मात्र लॉकडाऊन हा पर्याय वापरू नये या बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी समाजसेवक तथा युवा नेते समियोदीन इनामदार यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close