#Social

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय…….!

सुमारे 11 हजार शिक्षक - कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ......!

मुंबई दि.२३ – सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित दिव्यांग शाळा-विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहे येथील 4899 शिक्षक व 6159 अन्य कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. मागील मागील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती, सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात विविध त्रुटी दूर केल्या असून, या 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासूनचा सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने, राज्यभरातील शिक्षक-कर्मचारी संघटनांनी धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close