#Social

राजकीय पक्षाच्या सहकार्यातून केज तालुक्यात सुरू झाले पाहिले कोविड केअर सेंटर…….!

केज दि.8 – परिसरातील रुग्णांची सोय होण्यासाठी मनसेच्या पुढाकारातून आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने शिरुरघाट येथे लताई कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. केज तालुक्यात राजकीय  पक्षाच्या पुढाकारातून सुरू झालेले हे पाहिले कोव्हिड सेंटर आहे.
            ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि नंतर त्यांची होणारी गैरसोय पाहता केज तालुक्यात कोव्हिड सेंटर सुरू करावेे यासाठी मनसे पुढाकार घेण्यास तयार असून सर्व सहकार्य करण्यात येईल अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी प्रशासनाकडे केली होती. आणि प्रशासनाच्या मंजुरी नंतर शिरुरघाट येथे 8 मे रोजी लताई कोव्हिड सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
                यावेळी तहसीलदार मेंडके, मनसेचे जिल्हााध्यक्ष सुमंत धस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ.तांबडे, लताई कोव्हिड सेंटरचे आरोग्य अधिकारी दोडके उपस्थित होते. सद्तारील
             सदरील ठिकाणी 50 बेडची व्यवस्था असून चार डॉक्टर मिळून बारा वैद्यकीय कर्मचारी कार्यरत असणार आहेत. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, संगित रजनी सारखे मनोरंजनाचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष कल्याण केदार यांनी केले. सर्वच राजकीय पक्षांसमोर मनसेने आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमास  तालुकाध्यक्ष कल्याण केदार, गोविंद हाके, गुणवंत सांगळे, विक्रम सांगळे, राजेंद्र घोळवे, विजय हंगे, अमोल केदार हे उपस्थित होते.

दानशुर लोकांनी मदत करावी – धस

              यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस म्हणाले की, केवळ निवडणुकीपुरते मतदानासाठी जनतेसमोर न जाता लोक अडचणीत असतानाही त्यांना मदत करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आज मनसे या एकमेव राजकीय पक्षाच्या वतीने केज तालुक्यात पहिले कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले.  यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी शक्य असेल तेवढी मदत करावी. यामुळे रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होतील तसेच राजकीय पक्षांनीही पुढाकार घेऊन कोव्हिड सेंटर सुरू करुन मायबाप जनतेची सेवा करावी असे आवाहन धस यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close