#Accident

मायलेकीचा होरपळून मृत्यू……!

माजलगाव दि.23 – शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव परिसरात रविवारी (दि.23) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.

 शशिकला  शंकरराव फफाळ (वय 65) व त्यांची मुलगी सखुबाई शंकरराव फफाळ (वय 45) अशी मयतांची नावे आहेत. त्या घरात झोपलेल्या होत्या यावेळी अचानक शॉर्टसर्किटने घरात आग लागली. या आगीत दोघींचाही होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे, उपनिरीक्षक निलेश इधाटे, कर्मचारी राठोड यांनी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close