#Lockdown

31 मे पर्यंत बीड जिल्ह्यात निर्बंध लागू……!

बीड दि.२४ – जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याने कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक २५.०५.२०२१ रोजीथे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते ३१.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पारित केले आहेत.
             दिनांक २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते ३१.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. यामध्ये सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील. भाजीपाला विक्रीस केवळ हातगाडीवरुन प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते ०९.०० वाजेपर्यंत परवानगी राहील. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील. बैंक/ ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु.०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोलपंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व
शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा-या आस्थापना यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल. दरम्यानच्या काळात एटीएम कैशच्या वाहनांना परवानगी असेल. तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल.
          तसेच शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील. (ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.) लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तींना मेसेज आला आहे / आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल. (लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र, आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल.) कृषी व्यवसायाशी संबंधित बि-बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि-बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल. तसेच कृषि विक्रेत्यांना/ शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, औषधे विक्रीस/ खरेदीस सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत परवानगी असेल. नरेगाची कामे सुरु राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा व कोविड १९ विषयक पाळणे बंधनकारक असेल. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक २६.०५.२०२१ पासुन सकाळी ०७.०० ते दुपारी 1 या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. (राशनसाठी जाणा-या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड, आधारकार्ड असणे आवश्यक आहे.) तर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील.
             दरम्यान दिनांक २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते ३१/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close