केज दि.१३ – बाथरूमला निघालेल्या २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग करीत पीडित महिलेस व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २५ वर्षीय महिला ही १२ जून रोजी सकाळी नऊ वाजता बाथरूमला निघाली होती. ती एकटीच जात असल्याची संधी साधून गुरुलिंग बारीकराव दराडे या तरुणाने तिचा पाठलाग करीत तिला गाठले. त्याने वाईट हेतूने हात धरून लज्जास्पद बोलत विनयभंग केला. पीडित महिलेने विरोध केल्याने तिला व तिच्या पतीस लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून गुरुलिंग दराडे याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे ह्या करीत आहेत.