क्राइम

गतिमंद युवतीवर वर्षभरापासून वारंवार अत्याचार……!

परळी दि.२१ – तालुक्यातील २१ वर्षीय गतिमंद युवतीवर एका नराधम तरुणाने वर्षभरापासून सातत्याने अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोविंद मुंजाजी रुद्रे (वय २१, रा. वडगाव, ता.जि. औरंगाबाद) असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची २१ वर्षीय मुलगी गतिमंद आहे. गोविंद रुद्रे हा नेहमी त्यांच्या घरी येत असे. मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्याचे इकडे राहणे वाढले होते. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत मागील वर्षभरापासून गोविंदने घरात कोणी नसतानाची संधी साधून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली आणि तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. सदर फिर्यादीवरून गोविंद रुद्रे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास फौजदार मोनाली पवार या करत आहेत.

दरम्यान गुन्हा दाखल होताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे एक पथक फरार आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. गोविंद औरंगाबादला असल्याची खबर मिळाल्यानंतर या पथकाने औरंगाबाद गाठून त्यास अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या आणि अंबाजोगाईला आणले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close