#Vaccination
केज उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण आज बंद – डॉ.संजय राऊत
केज दि.२५ – पहिल्या डोस साठी केज उपजिल्हा रुग्णालयात आलेला लसीचा साठा संपल्यामुळे आज दि.२५ रोजी लसीकरण बंद राहणार आहे.मात्र कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यासाठी लस उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली आहे.
मागच्या चार दिवसांपूर्वी आलेला लसीचा साठा संपलेला आहे. आज दुसरा लॉट येण्याची अपेक्षा होती. मात्र लस उपलब्ध झाली नसल्याने नागरिकांनी पहिला लसीकरणासाठी रुग्णालयात येऊन गर्दी करू नये. मात्र ज्यांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे ते नागरिक येऊ शकतात असे डॉ.राऊत यांनी कळविले आहे. तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर सूचित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.