क्राइम

”या”प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला अटक…..!

मुंबई दि.२० –  प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मीती करुन या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठलाही अटक करण्यात आलं होतं.

फेब्रुवारीमध्ये अश्लील व्हिडीओ शूट करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी अकरा जणांना अटक केली होती. अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं होतं. तपासामध्ये समोर आलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत यांना केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळायचं. राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी केनरिन प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन आहे. या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे.

दरम्यान, अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांच्या चौकशीतून धागेदोरे लागत राज कुंद्राची चौकशी करण्यात आली. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर काल संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचं सांगत राज कुंद्रा यांना अटक केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close