क्राइम

मूल होत नसल्याच्या व इतर कारणावरून विवाहितेचा छळ…….!

केज दि.२६ – माहेरवरून घर बांधण्यासाठी पैसे घेऊन ये, तुला मुलबाळ होत नाही या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सहा जणां विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील देवगाव येथील विवाहितेचा पती केशव महादेव नागरगोजे, सासु सत्यभामा महादेव नागरगोजे, सासरे महादेव भानुदास – नागरगोजे, आरूण महादेव नागरगोजे, जाऊ सोनाली आरून नागरगोजे, छोटा दिर विनोद महादेव नागरगोजे सर्व रा. देवगाव केज यांनी जुन 2016 ते दिनांक 24/01/2021 रोजी 10 वाजेपर्यंत फिर्यादीचे सासरी देवगाव ता. केज येथे व पुणे येथे संगणमत करून फिर्यादीस तु माहेरहून घर बांघन्यासाठी पैसे घेवुन ये म्हणुन तसेच फिर्यादीवर शक घेवुन, तु चांगली नाहीस, तुला मुलबाळ होत नाही, असे म्हणुन सतत शिवीगाळ करून मारहान करून उपाशिपोटी ठेवुन, घरातील सर्व कामे करून घेवुन मानसिक व शारिरीक छळ करून जाचजुलूम केला व जिवे मारण्याची धमकी देवुन घरातुन हाकलुन दिले.
सदर प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व महिला तक्रार निवारण केंद्र यांच्या पत्रावरून वरील सहा जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. नखाते हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close