क्राइम

केज येथे चोरट्यांचा बांधकाम साहित्यावर डल्ला

 केज दि.२६ – घर बांधकामासाठी आणून ठेवलेले १५ हजार रुपयांचे लोखंडी गज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना केज शहरातील रेणुका नगर भागात घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
      केज शहरातील रेणुका नगर भागातील रुक्मिण ज्ञानोबा घुले या वृद्ध महिलेने घराचे बांधकाम करण्यासाठी २ क्विंटल ४५ किलो लोखंडी गज आणून राहत्या घरासमोर ठेवले होते. २४ मे रोजी रात्री त्या झोपल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी १५ हजार ४०० रुपये किंमतीचे लोखंडी गज चोरून नेले. रुक्मिण घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मंगेश भोले हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close