क्राइम
शासकीय कामात अडथळा, केज पोलीसांत गुन्हा दाखल……!
केज दि.९ – तू कंडक्टर आहेस काय तुला गाडी निट वळवता येत नाही का असे म्हणत एका तरुणाने बसच्या वाहकास शिवीगाळ करीत गालात चापट मारल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे सोमवारी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
परिवहन महामंडळाच्या धारूर आगारात बस वाहक पदावर कार्यरत असलेले इंदर वसुदेव हांगे ( वय ४२, रा. हांगेवाडी ( रामेश्वरवाडी ), ह. मु. आदर्श कॉलनी केज ता. केज ) हे सोमवारी दुपारच्या केज – विडा या एसटी बसवर ड्युटीला होते. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही बस विडा गावात पोहचल्यानंतर बस वळवून घेत असताना बबलू सल्लाउद्दीन शेख ( रा. विडा ) याने बसचे वाहक इंदर हांगे यांना तू कंडाक्टर आहेस काय तुला गाडी निट वळवता येत नाही का असे म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या गालात चापट मारून शासकीय कामात आडथळा केला. अशी फिर्याद बसचे वाहक इंदर हांगे यांनी दिल्यावरून बबलू शेख याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.