#Education

शाळा बंदच राहणार, टास्क फोर्स च्या बैठकीनंतर सरकारचा निर्णय…….!

मुंबई दि.12 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. 

               टास्क फोर्सनं शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आता राज्य सरकारने शाळा सुरु होण्याबाबत जो निर्णय घेतला होता त्या जीआरला स्थगिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी शाळा सुरू होण्याबाबत आक्षेप घेतला होता. शाळा सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यावर भर दिला.
पालकांकडून शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाने सर्व्हे घेतला होता. त्यात ८० टक्के पालकांनी शाळा सुरु कराव्यात असा कौल दिला होता. सर्व्हेच्या आधारावर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तुर्तास हा निर्णय थांबवला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत. 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close