केज दि.१६ – शहरातील रोजा मोहल्ला या गजबजलेल्या भागात असणाऱ्या मेडिकल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून रोख रक्कमेसह मोबाईल चोरीची घटना घडली आहे.
दिनांक 16/8/2021 रोजी 00.30 वाजण्याचे दरम्यान रोजा मोहल्ला भागात असलेले ऐतेशाम मुसताक खतीब हे हयात मेडीकल दुकान रात्री बंद करुन घरी गेल्यानंतर सदरील घटना घडली. सकाळी नऊ वाजण्याचे सुमारास मेडीकल वर कामावर असलेला मुलगा रोहीत कांबळे हा मेडीकलवर कामासाठी गेला असता त्याला मेडीकलच्या शटर चे कुलूप तुटलेले दिसले तेव्हा सदरील प्रकार लक्षात आला. रोहीतने खतीब यांना चोरी झाल्याची माहिती दिली असता ते व त्यांचा भाऊ ताजीम मुस्ताक खतीब तात्काळ दुकानात पोहोचले असता मेडीकल मधील एक sumsung Galaxy S7 edge कंपनीचा मोबाईलच्या तिचा imel no 355241/08/020128/9,355242/08/ 020128/7 असे असलेला सिमकार्ड क्र.9130309043,9028879722 असे असलेला कि.अं.15000/- रुपये व नगदी 27,870/-रु असे एकुण 42,870/- रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान दुकान मालक ऐतेशाम खतीब यांच्या तक्रारीवरून अज्ञातां विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती.