क्राइम
आईला मारहाण केल्यानंतर मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पळून चालला होता मुलगा…..!
नेकनूर दि.21 – रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून चाललेल्या मुलाला दीड तासाचा पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेण्यात एपीआय लक्ष्मण केंद्रे यांना यश आले.
चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे वय 70 या महिलेचा मुलाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची खबर सकाळी नेकनुर पोलिसांना मिळाल्यानंतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी सूत्रे हलवत पीएसआय विलास जाधव यांना घटनास्थळी रवाना करून स्वतः पळून चाललेल्या मुलाच्या दिशेने निघाले. बीड, गेवराई मार्गे महाकाळ येथे सासुरवाडीकडे संशयित आरोपी मदन पांडुरंग मानगिरे वय 28 पळून जात असल्याची खबर असल्याने विलंब न करता स्वतः च्या खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग करत शहागडच्या जवळ त्याला दुचाकी वरून ताब्यात घेतले. आरोपी सोबत लहान मुलगा होता त्यांना नेकनूर पोलिस स्टेशन ला आणले आहे. शवविच्छेदन अहवाला नंतर गुन्हा नोंद केला जाणार आहे. प्रथमदर्शी माहितीनुसार मुलाच्या माराने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.