#Social

विहित कालावधीत काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा सभापती घुले यांच्या हस्ते सत्कार…….!

केज दि.२७ – वंचित, दुर्बल घटक यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. अशा नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी वेगवेगळ्या घरकुल योजने मार्फत अर्थ पुरवठा केला जातो. मात्र कांही लाभार्थी याचा फायदा घेतात तर कांही दुर्लक्ष करतात. परंतु गरजू लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केज पंचायत समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
                    पंचायत समिती अंतर्गत पंचायत समिती सभागृहात केज तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व रमाई आवास योजना (ग्रामीण) मधील विहीत वेळेत ज्या लाभधारकांनी घरकुल बांधकाम पुर्ण केले अशा निवडक लाभार्थ्यांचा पुष्‍पगुच्‍छ व प्रशस्तीपत्रक देऊन पंचायत समितीच्या सभापती परिमाळा विश्वनाथ घुले, गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्या यांच्या हस्ते सत्कार करण्याात आला.
                      कार्यक्रमास सभापती परिमाला घुले यांच्यासह पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, घरकुल विभागातील सर्व कर्मचारी वृंद तसेच पंचायत समिती कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close