केज दि.३१ – तू आमच्या घरगुती भानगडीत कशाला पडतोस असे कारण काढून एका ५४ वर्षीय इसमास शिवीगाळ करून दगडाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना देवगाव येथील कृषी विद्यालयात ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील सासुरा येथील धोंडीराम भानुदास पाळवदे ( वय ५४ ) हे ३० ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास गावाकडे येत असताना देवगाव येथील लिंबाजीराव नागरगोजे कृषी विद्यालयाजवळ त्यांच्या गावातील आत्माराम रामभाऊ पाळवदे याची भेट झाली. त्याने तू आमच्या भानगडीत का पडतोस असे कारण काढून शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करीत धोंडीराम पाळवदे यांना या कृषी विद्यालयात नेऊन दगडाने तोंडावर, नाकावर, डोळ्यावर, छातीवर व पायावर मारून गंभीर जखमी केले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आत्माराम पाळवदे हा तेथून निघून गेला. अशी फिर्याद धोंडीराम पाळवदे यांनी दिल्यावरून आत्माराम पाळवदे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे हे करीत आहेत.