क्राइम

शेतकऱ्याच्या खिशातून १७९०० रुपये लंपास, केज पोलीसांत गुन्हा दाखल……! 

केज दि.३ – पोळा सणाच्या खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या खिशातून चोरट्याने १७ हजार ९०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना केज शहरातील कानडी चौकात घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
                केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथील शेतकरी चंद्रकांत सखाराम राऊत हे पोळा सणाच्या खरेदीसाठी शुक्रवारी केज शहरात आले होते. आठवडी बाजारात खरेदी करून झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास कानडी चौकातील एका दुकानातून त्यांनी नारळ खरेदी केले. त्यांनी पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेले १८ हजार रुपये काढून त्यातील १०० रुपये दुकानदारास देऊन उर्वरित १७ हजार ९०० रुपये परत पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवले. मात्र पाळत ठेवून पाठीमागे असलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील १७ हजार ९०० रुपये घेऊन पोबारा केला. चंद्रकांत राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close