राजकीय

किरीट सोमय्यांना कराडमध्येच रेल्वेतून उतरवले…….!

मुंबई दि.२० – भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशन वरती ताब्यात घेतलेले आहे. मंगळवार दि. 20 रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान किरीट सोमय्या कोल्हापूर कडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

                    राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वरती गेल्या दोन- तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. तसेच प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास येऊ नये म्हणून नोटीस दिली होती. मात्र तरीही किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून मुंबईतून कोल्हापूरकडे रविवारी रात्री रवाना झाले होते. मात्र सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड येथील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतलेले आहे.
               दरम्यान, किरीट सोमय्या यांना पोलीस बंदोबस्तात त्यांना ताब्यात घेऊन येथील शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे. सोमय्या हे 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर दोन दिवसांनी पुन्हा कोल्हापूर ला जाणार असे त्यांनी सांगितले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close