#Judgement

करुणा शर्मा यांना जामीन, 5 सप्टेंबर ला झाली होती अटक……!

बीड दि.21 – बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. न्या.सापटनेकर यांनी हा जामिन मंजूर केला. शर्मांच्या जामिनावर सोमवारी (दि.२०) सुनावणी पुर्ण झाली होती. त्यात न्यायालयाने आज शर्मा यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती.

करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलीसांनी ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. सोमवारी न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या समोर जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड.भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतिने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली.दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर मंगळवारी न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला. शर्मा यांना तब्बल १६ दिवस कोठडीत काढावे लागले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close