#निधन वार्ता

108 रुग्णवाहिका पायलटचा मृतदेह आढळला……!

धारूर दि.25 – इतरांचे जीव वाचवण्यासाठी रात्री बेरात्री 108 रुग्णवाहिका घेऊन धावणाऱ्या पायलट चाच मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
          खोलेश्वर बाबुराव निर्मळ (38)  असे पायलट चे नाव असून ते धारूर जि. बीड येथे 108 रुग्णवाहिका पायलट म्हणून कार्यरत होते. धारूर येथील सरकारी दवाखाना परिसरातील सरकारी निवासस्थानी ते राहत होते. एका पायलट ची ड्युटी संपल्यानंतर गाडीची चावी देण्यासाठी ते निर्मळ यांच्याकडे गेले असता सदरील घटना उघडकीस आली.
           दरम्यान ते त्यांच्या कुटुंबियांसंवेत तेथे राहत होते. परंतु रात्री घरी कुणी नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close