#निधन वार्ता

गरिबीला कंटाळून 16 वर्षीय युवतीची आत्महत्या……!

केज दि.३० – वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षणाचा व घर खर्च भागत नसल्याच्या विवंचनेतून एका १६ वर्षीय युवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील येवता येथील तांड्यावर घडली. दैवशाला परशराम राठोड असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
       येवता येथील तांड्यावरील दैवशाला परशराम राठोड ( वय १६ ) ही इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या वडिलांची गरिबी परिस्थिती असल्याने तिच्या शिक्षणाचा व घरचा खर्च भागविण्यास त्यांची ओढाताण सुरू होती. त्यामुळे वडीलांच्या गरिबी परिस्थितीतून शिक्षण आणि घर खर्च भागत नसल्याने या विचाराने तिच्या मनावर परिणाम झाला. या विवंचनेतून तिने टोकाची भूमिका घेत १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.४५ वाजेच्या दरम्यान दैवशाला हिने विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी करून मृत घोषित केले. ३० सप्टेंबर रोजी तिचा भाऊ बालासाहेब परशराम राठोड याच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close