महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात……!

 

हिंगोली दि.13 – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत. पण यावेळी ते शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले आहेत त्याच घोड्यावर चढून पुष्पहार अर्पण करतानाचे दृश्य आहेत. त्यांच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. नवघरे यांच्या या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

“महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही. कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यत्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जातोय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. पुतळा शहरात उभारावा यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांना आम्ही नोटीसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला राजकीय षडयंत्रातून बदनाम केलं जातंय”, असं आमदार नवघरे म्हणाले.

“मी अठरा पगड जातीला मानणारा कार्यकर्ता आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो तेव्हा खासदारसाहेब होते. माजी आमदार मुंदडा साहेब येथे होते. मला यांनी वर चढवलं. तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणाले, मला यांनी वर चढवलं, शिवसेनेचे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडाही वर चढले. पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझी चूक झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही”, असं बोलत असताना आमदार राजू नवघरेंना रडू कोसळलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close