ब्रेकिंग

सिरम इन्स्टिटय़ूट ला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

पुणे दि.२१- सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी दुपारी सिरमच्या निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्याला आग (Fire) लागली. दहा अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना इमारतीतून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग विझवल्यानंतर इमारतीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याचे समोर येत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close