#Social

थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…..!

बीड दि.१ –  “जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव” असे सांगून आपल्या अखंड आयुष्यात लेखणीतून कामगार ,कष्टकरी गोरगरीब जनतेला न्याय देणारे व अंधश्रद्धा निर्मूलनाच मोठ काम केलेले ,तसेच “पृथ्वी ही शेष नागावर वसली नसून ती कष्टकरी ,कामगाराच्या तळहातावर वसली आहे असं ठणकाऊन सांगणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
           शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय विद्यार्थी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष डॉक्टर जितीन वंजारे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सरवदे, सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाट ,सूर्यकांत सरवदे, विशाल सरवदे, नाना सरवदे, नितीन सरवदे, रमेश वाल्हेकर, पवन कांबळे, अक्षय तुरुकमारे, शुभम सरवदे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close