#Accident

२७ वर्षीय तरुणाचा मृत्यू…….!

केज दि.१५ – तालुक्यातील शिंदी ते नामेवाडी पाटी दरम्यान झालेल्या अपघातात संतोष बळीराम केदार वय (२७ वर्ष) राहणार गप्पेवाडी याचा मृत्यू झाला आहे.
               दि. १५ नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी ७ वा. च्या दरम्यान संतोष बळीराम केदार (२७) रा. गप्पेवाडी ता. केज हा युवक मोटार सायकल वरून जात असताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
           दरम्यान जखमी संतोष केदार यास नातेवाईक उपचारासाठी केज येथील उपजिल्हारुग्णालयात घेऊन आले होते परंतु डॉक्टरांनी सदरील तरुणाची तपासणी करून मृत घोषित केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close