#Social

ओबीसी महाएल्गार मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहा.. !

6 / 100 SEO Score
केज दि.१४ – बीड येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव महा एल्गार मेळाव्याची तयारी जय्यत सुरू असून सदरील मेळाव्याला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी समाजच्या वतीने करण्यात आले आहे.
                मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता त्यांना एक वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. २ सप्टेंबर चा जीआर रद्द करण्यात यावा ओबीसीच्या यासह विविध मागण्या घेऊन अखिल भारतीय समता परिषद तसेच सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीडमध्ये ओबीसी महा एल्गार मेळाव्याचे आयोजन दिनांक १७ ऑक्टोबर दुपारी चार वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण  येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यासह, मंत्री पंकजा मुंडे, माजीमंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
               दरम्यान, सदरील मेळाव्याला लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित राहणार असून समता पसरिषदेचे विभागीय अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सभेची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. तरी सकल ओबीसी बांधवांनी मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केज तालुका सकल ओबीसींच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close