#Accident

दुचाकी अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

9 / 100 SEO Score

केज दि. १२ – अंबाजोगाई-कळंब मार्गावरील माळेगाव (ता. केज) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. 12) मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकी आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक लागली या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन नवनाथ ढगे (वय 31) आणि सलीम जयनू शेख (वय 25), (दोघेही रा.भोपा,ता.धारूर) हे एमएच 26 एएल 5157 क्रमांकाच्या दुचाकीवरून अंबाजोगाई येथे दवाखान्यात असलेल्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते. तेथून गावी परत जात असताना रस्ता चुकल्याने ते अंबाजोगाई-कळंब मार्गावर आले. माळेगाव जवळ आल्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर त्यांच्या दुचाकीची अज्ञात वाहनाशी जोरदार धडक लागली या अपघातात किसन ढगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सलीम शेख यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच जवळील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सलीम शेख यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,युसुफवडगाव ठाण्याच्या पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close