#Accidentव्हायरल

चोवीस तासात दोनदा जळाली डीपी…..!

9 / 100 SEO Score

केज दि.१९ – बारा महिने तर केज शहरातील महावितरणच्या मनमानीमुळे रहिवाशी रहिवासी त्रस्त आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या सणातही शहरातील काही भाग हा पूर्णपणे अंधारात गेला असून प्रकाशाच्या सणामध्ये सर्वत्र काळोख पसरला आहे.

              केज शहरामध्ये अनेक भागात बाराही महिने कित्येक तास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. शहरामध्ये असलेले विद्युत रोहित्र अगदी मोडकळीस आले असून वारंवार त्याची दुरुस्ती केली तरीही विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरे झाल्याने व विद्युत जोडण्या वाढल्याने संबंधित डीपीवर मोठ्या प्रमाणावर भार पडतो आणि मग विद्युत खंडित होतो. मात्र यावर ठोस असा उपाय महावितरण कडून होताना दिसत नाही. आणि याचाच एक भाग म्हणून केज शहरातील उमरी रोडवरील अहिल्यादेवी नगर, गणेश नगर, समता नगर, सहयोग नगर, द्वारका नगरी इत्यादी वसाहतींना विद्युत पुरवठा करणारी अहिल्यादेवीनगर डीपी शनिवारी पहाटे जळून खाक झाली. ती बदलण्यासाठी रात्रीचे दहा वाजले. कशीबशी ती डीपी चालू केल्यानंतर रात्रभर अत्यंत कमी दाबाने विद्युत पुरवठा चालू राहिला. परंतु पुन्हा रविवारी सकाळी त्याच डीपीवर मोठा आवाज झाला आणि विद्युत पुरवठा संबंधित भागातील पूर्णपणे बंद झाला. अद्यापही विद्युत पुरवठा बंद असून ऐन दिवाळीच्या सणामध्ये रहिवाशांवर काळोखा मध्ये शिमगा करण्याची वेळ आलेली आहे. आता आज बिघडलेली डीपी कधी दुरुस्त होते आणि कधी विद्युत पुरवठा पूर्वत होतो याकडे लक्ष लागले आहे.
                 दरम्यान अहिल्यादेवी नगर डीपी वर सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त विद्युत जोडण्या झाल्यामुळे दररोज सकाळी सहा वाजता फ्युज जातात आणि मग नऊ दहा वाजेपर्यंत लाईनमनला जाग येई पर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे विद्युत जोडणीच्या संख्येनुसार  डीपीही मोठ्या क्षमतेची बसवणे गरजेचे आहे. मात्र याकडे महावितरण कसल्याच प्रकारचे लक्ष देताना दिसत नाही.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close