#Socialआरोग्य व शिक्षण
केज उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान…..!

केज दि.४ – शहरालगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात महिन्यातील पहिल्या शनिवारी स्वच्छता अभियान मोहीम अंतर्गत परिसराची स्वच्छता करण्यात येते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ करण्यात आला.
सदरील स्वच्छता अभियानात मेट्रन श्रीमती पळशीकर, श्रीकृष्ण नागरगोजे, श्रीमती गवळी, श्रीमती जोगदंड ,श्रीमती भोपळे, श्रीमती साळवे, श्रीमती चव्हाण, श्रीमती गायकवाड, श्रीमती घुले, श्रीमती गिरी, श्रीमती पौळ, श्रीमती कराड,श्रीमती किवटे, श्रीमती सोनवणे,नासेर अली, श्री. माळी,यांच्यासह आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, सर्व कचरा एकत्रित करून कचरा व्यवस्थापन करण्यात आले. राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामुळे परिसर स्वच्छ व सुंदर दिसून येत आहे.