ब्रेकिंग

19 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ….!

10 / 100
अंबाजोगाई दि.७ –  येथील एका लॉजवर १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह (दि. ७) सायंकाळी ५.३० च्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली. सदरील तरुणाचा मृतदेह लॉजच्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अंबाजोगाई शहर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
              सोमनाथ येडे (रा. सोमनाथ बोरगाव) हा तरुण योगेश्वरी देवीच्या मंदिरानजीक असलेल्या एका लॉजवर एका मुलीसोबत आला होता. सायंकाळी ५.३० च्या सुमारास लॉजमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेतत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
               मुलगी फरार झाल्याची माहिती असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनोद घोळवे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close