संपादकीय

आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप…..!

12 / 100
केज दि.९ – तालुक्यातील साबला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , साबला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कटारे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
             नरहरी काकडे हे नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे, मनातून निस्वार्थ सामाजिक कार्याची आवड असणारे तसेच समाजसेवेचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त समाज सेवक, गोरगरीब, वंचीतांच्या सुखदुःखाला, अडीअडचणीच्या वेळेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच जनाबाई काकडे यांच्या हस्ते शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
              सदरील कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच कचराबाई सरवदे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, लखन कटारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कटारे, शंकर नाईकनवरे, लखन राऊत, मुख्याध्यापक हनुमंत कटारे, धनंजय धाट, श्री.जगदाळे, सहशिक्षक लोकरे, श्रीमती फाटे इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close