संपादकीय

केजच्या चैतन्य देशपांडे ची आयर्लंडला भरारी…..!

7 / 100
केज दि.७ – श्री स्वामी समर्थ मठ केज येथील दिनेश देशपांडे यांचे चिरंजीव चैतन्य देशपांडे यांनी आयर्लंड या देशातील जागतीक पातळीवर नावाजलेल्या yahoo.com या कंपनी मध्ये Software developer म्हणून नौकरी मिळवली आहे. याबद्दल केज जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार व सर्व केजकर देशपांडे यांनी श्री समर्थ मठ केज येथे सत्कार करून अभिनंदन केले आहे.
                       चैतन्य देशपांडे यांनी Engineering JNEC छत्रपती संभाजीनगर येथे पुर्ण करुन, 3 वर्ष Reliance jio मध्ये Software developer म्हणून काम केले होते. त्यानंतर डबलिंग आयर्लंड येथे Masters in Computer Science केले आणि आयर्लंड येथीलच जागतिक पातळीवरील yahoo.com या कंपनीमध्ये Software developer म्हणून नौकरी मिळवली आहे.
                     त्याच्या या यशाबद्दल केजशहरवासीय, मित्रपरिवार व व्यापारी वर्गाकडून चैतन्य यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. चैतन्य हा केज येथील गणेश देशपांडे व मंदार देशपांडे यांचा पुतण्या आहे. यावेळी प्रविण देशपांडे, बाळासाहेब ठोंबरे, श्री. यादव, वाघमारे व केजकर देशपांडे परिवार उपस्थित होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close