#Social

भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा स्पर्धा….!

7 / 100
केज दि.१८ – तालुक्यातील जिवाचीवाडी हायस्कूल जिवाचीवाडी या विद्यालयामध्ये नवगण विनायक  शिक्षण संस्थेचे सचिव ,बीड नगरीचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतभूषण क्षीरसागर  यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
             यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस वितरण दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.सी.चौरे तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या हस्ते बीड जिल्ह्याच्या माजी खासदार कै.काकू व नाना यांच्या प्रतिमेचे पूजन केले व नवगण युवक विनायक शिक्षण संस्थेचे सचिव  भारतभूषण क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
              कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.भोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. साबळे यांनी केले. यावेळी श्री.मुळे,तट, चौरे, सारुक उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close