क्रीडा व मनोरंजन

‘हे’ दोन स्टार क्रिकेटर येणार बीड जिल्ह्यात….!

6 / 100
बीड दि.२८ – ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथे आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा येत्या ३ मार्च रोजी फायनल होणार आहे. या फायनल सामन्यासाठी व बक्षीस वितरणासाठी भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज, प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग तसेच भारतीय क्रिकेट संघाची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला क्रिकेटपटू जहीर खान हे दोघेही परळी वैद्यनाथ येथे उपस्थित राहणार आहेत.
          मागील सुमारे एक महिन्यापासून परळी शहरात नाथ प्रतिष्ठान आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये परळी शहरासह परळी विधानसभा मतदारसंघातून २६० पेक्षा अधिक संघांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर डीएम ११ या क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता.
                 सदरील स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेचा फायनल येत्या ३ मार्च रोजी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर खेळवला जाणार असून त्यानंतर त्याच ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
          दरम्यान, फायनल सामन्यासह बक्षीस वितरणाच्या समारंभास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेला युवराज सिंग तसेच बॉलिंग ची स्पीड मशीन म्हणून प्रसिद्धीस असलेला जहीर खान यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close