क्राइम

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला….!

6 / 100
केज दि.२४ – प्राचार्य राहुल गदळे यांच्या दहिफळ वडमाऊली येथील घरावर अज्ञात सात ते आठ लोकांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसला.
              तालुक्यातील काळेगाव घाट येथील महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल गदळे यांचे दहिफळ वडमाऊली येथील राहते घरी दि. २३ मार्च रोजी मध्यरात्री घरा समोर विना नंबरच्या दोन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून सात ते आठ अनोळखी दरोडेखोर उतरले. त्यातील एकाने त्यांच्या घरा समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी त्यांच्या घराशेजारी असलेल्या शेजाऱ्यांना चाहूल लागल्याने दरोडेखोर घरात प्रवेश न करता पळून गेले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
                         दरम्यान त्या चोरट्या पैकी दोघांच्या अंगावर खाकी रंगाचे कपडे असल्याची चर्चा आहे. प्राचार्य राहुल गदळे यांच्या तक्रारी वरून दि. २४ मार्च रोजी केज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close