#Accident

केज – मांजरसुंबा रोडवरील मस्साजोग जवळ अपघात…..!

12 / 100

केज दि.२७ – मांजरसुंबा राज्य रस्त्यावरील मस्साजोग ते कोरेगावच्या दरम्यान सायंकाळी दोन चार चाकी वाहनांचा अपघात झाला असून दोन्हीही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन पडले आहेत.

               मस्साजोग पासून केज कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पुलावर उतार असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होऊ लागलेले आहेत. आणि त्याच ठिकाणी पुन्हा आज (दि.२७) सायंकाळच्या वेळेला दोन चार चाकी वाहनांचा अपघात झाला असून वाहनांचा अगदी चक्काचूर झाला आहे. मात्र यामध्ये किती लोक जखमी झाले आहेत याची सविस्तर माहिती अद्याप पर्यंत मिळालेली नाही. तसेच अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदरील अपघातातील स्कॉर्पिओ ही तालुक्यातील नाहोली येथील रणजित बिक्कड यांची तर दुसरी गाडी बीड येथील असल्याचे सांगण्यात आले.
             दरम्यान, अगदी पुलावरच असलेली जम्पिंग अगदी जवळ येईपर्यंतही दिसत नसल्याने आणि वाहने वेगात असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळे अशी धोकादायक जम्पिंग तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close