ब्रेकिंग

विहिरीत आढळला २२ वर्षीय विवाहितेचा मृतदेह

केज दि.२ –  २२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत शिंदी (ता. केज) येथे सोमवारी (१ एप्रिल) दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैष्णवी सिद्धेश्वर जाधव ही महिला सोमवारी सकाळी शिवारातील त्यांच्या सजगनी नावाच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी २.३० वाजता वैष्णवी या तरुण महिलेचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच सहायक फौजदार राजू वाघमारे, होमगार्ड प्रकाश मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली.
                 दरम्यान, विहिरीतून मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी केज पोलिसांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या महिलेस एक लहान मुलगा आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close