मागील चार दिवसांपासून पेट्रोल,डिझेल, सीएनजी चा सर्वत्र तुटवडा आहे. त्यामुळे गाडीत पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात बळी गेला. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून टॅंकर ताब्यात घेतले.
तरुणावर औरंगपूर येथील शेतात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अत्यंत शांत स्वभावी व हुशार व्यक्तीमत्व म्हणुन परिचित असलेला तरुण लातुर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नाशिक येथे मेडीसीन कंपनीत कार्यरत होता. हाडाचे चाळे बसवणे खांदे, गुडगा, मनकादुखने यावर उपचार करण्यात तो तरबेज होता.