ब्रेकिंग

अंबाजोगाईत ४१ वर्षीयशालेय कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू…..!

6 / 100 SEO Score
तथागत चौकात आढळला मृतदेह
केज दि. १३ – अंबाजोगाई येथील तथागत चौकात सोमवारी सकाळी एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विवेक करपे असे मृत इसमाचे नाव असून, ते शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने हा घातपात की अपघात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकी घटना काय?
सोमवारी सकाळी अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात एका इसमाचा मृतदेह पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने याची माहिती अंबाजोगाई पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.
कोण होते विवेक करपे?
मृत विवेक करपे (वय ४१) हे मूळचे केज तालुक्यातील जवळबन गावचे रहिवासी होते. सध्या ते आपल्या पत्नी व मुलाबाळांसह केज येथे वास्तव्यास होते. ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खासगी शाळेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, इयत्ता १० वीत शिकणारा मुलगा आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपासाची दिशा
घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना मयताच्या खिशात प्रवासाचे तिकीट सापडले आहे. यावरून करपे हे केजवरून किंवा अन्य ठिकाणाहून प्रवास करून अंबाजोगाईत आले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
          दरम्यान, विवेक करपे यांचे वर्षभरापूर्वी पोटाचे मोठे ऑपरेशन झाले होते, अशी माहितीही समोर आली आहे. सध्या अंबाजोगाई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी केली जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close