#Accident

उमरी टोलनाक्याला ट्रकची धडक…..!

9 / 100 SEO Score
केज दि. ३० – केज – मांजरसुंबा रस्त्यावरील उमरी फाट्याजवळील टोलनाक्याला एका भरधाव मालवाहतूक ट्रकने धडक दिली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी २.१० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात टोलनाक्याचा तब्बल २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ‘एव्हीसी सेंसर’ तुटून मोठे नुकसान झाले आहे.

                  कर्नाटक राज्यातील नंदीबिजलगाव (जि. बिदर) येथील चालक रोहिदास गुंडेराव राठोड हा आपला मालवाहतूक ट्रक (के. ए. ५६ – ९४१९) घेऊन जात होता. उमरी फाट्याजवळील टोलनाक्यावर आला असता, त्याने ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवून बूथ नंबर ७ च्या एव्हीसी सेंसरला जोरदार धडक दिली.

याप्रकरणी टोलनाका कर्मचारी प्रीतम गौतम साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ट्रक चालक रोहिदास राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close