महाराष्ट्र

अखेर ”त्याने” मागितली माफी……!

मराठी भाषेचा केला होता अवमान

मुंबई | ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन मनसे आणि शिवसेना आक्रमक झाल्यानंतर जान कुमार सानूने माफी मागितली आहे.

बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आलं. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आलं.

माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावं, असा माझा हेतू नव्हता, असं जान कुमारल म्हणाला.

माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन, अशा शब्दात जान याने माफी मागितली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close