महाराष्ट्र

……..तर ईडीची भीती कशाला…….?

उस्मानाबाद दि.२५ – आमचे हात बरबटलेले नसतील तर आम्हाला काय भीती? केंद्रावर कशाला आरोप करायचे? आमच्याही घरी ईडी आली, आमची देखील सीडी बाहेर काढली, असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. ते उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मन साफ असलं तर काहीही येऊद्या. ईडी आमच्याही घरी येऊ शकते. हे नैराश्यातून केलेले आरोप आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे.
प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे, या टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं.

शेअर करा
Tags

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close