#Cyber Crime

ATM कार्ड क्लोनिंग करून पैसे उकळणारी टोळी जेरबंद, बीड व ठाणे सायबर विभागाची संयुक्त कारवाई……!

बीड दि.१० – भिमराव पायाळ रा.पंचशील नगर, बीड, यांच्या एस.बी.आय. बँकेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर 80,000/- रू एवढी रक्कम काढून फसवणूक केल्या प्रकरणी बीड व ठाणे सायबर क्राईम ब्रँच ने संयुक्त कारवाई करत एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे उकळणारी परराज्यातील टोळी जेरबंद केली आहे.
        पोलीस अधिक्षक, बीड यांच्या आदेशान्वेय पोलीस निरीक्षक आर. एस.गायकवाड, पोलिस ठाणे सायबर बीड करीत आहेत. सदर गुन्हयाचा तपासादरम्यान सदर फिर्यादीचे ATM कार्ड चे क्लोनिंग करुन दादर मुंबई येथे फिर्यादीचे बँक खाते मधुन 80,000/- रू काढण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हयाचा तपासा दरम्यान तांत्रीक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी बीरु राजेन्द्र पांडे, रा. मायापुर जिल्हा गया, बिहार, सतिषकुमार नंदलाल प्रसाद, रा. बडकी डेल्हा, जिल्हा गया, बिहार, मोहम्मद असद नसिम खाँन रा. मंजोलीगांव, जिल्हा गया, बिहार ह.मु. नाला सोपारा मुंबई व  मोहम्मद जावेद जब्बार खाँन रा. गया मंजोलीगाव, जिल्हा गया, बिहार यांनी केला आहे असे निषन्न झाले.
        दरम्यान दिनांक 09/02/2021 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हे शिर्डी येथे येणार आहेत, असे कळाल्यावरुन मा. पोलीस अधीक्षक, बीड व अप्पर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक टिम घेवुन शिर्डी येथे सापळा रचुन सदर आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता, सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले ATM CARD CLONING DEVICE, लॅपटॉप विविध बँकेचे 74 ATM CARD, व वेगवेगळया कंपनीचे 10 मोबईल आणि TATA NEXON कंपनीची चार चाकी वाहन असे एकुन अंदाजे किंमत 7,15,000/- रु. असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पुढील तपास आर. एस. गायकवाड, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, बीड हे करीत आहेत.
                  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, बीड , अप्पर पोलीस अधीक्षक , बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. रविंद्र गायकवाड, पोउपनि निशीगंधा खुळे, विजेंद्र नाचण, पोना अनिल डोंगरे, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, बप्पासाहेब दराडे, पोशि अविनाश गवळी, मपोशि सुनिता शिंदे, पोना कांबळे, किरण पवार, बाळकृष्ण रहाडे, वाहन चालक दुधाळ यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close